कंठमणी-मंगळसूत्र

View previous topic View next topic Go down

कंठमणी-मंगळसूत्र

Post  Admin on Wed 18 May 2011, 1:26 pm

कंठमणी म्हणजे विशुद्ध- चक्राशी असणारा मुहूर्तमणी. हा सुती धाग्यात ओवलेल्या काळ्या मण्यांच्या शृंखलेत मध्यात एक गोलाकार अन् त्यावर कोणतीही कलाकुसर (नक्षी) नसलेला असा सोन्याचा मणी असावा. या सोन्याच्या मण्याकडे आकृष्ट होणार्‍या ब्रह्मांडातील तेजतत्त्वाच्या लहरींमुळे विशुद्धचक्र नेहमी जागृत अवस्थेत रहाते. विवाहदिनी वधूच्या गळ्यात घालण्यात येणारा हा मणी विवाहाच्या १६ व्या दिवशी काढण्याची प्रथा चुकीची आहे. कंठमणी-मंगळसूत्र या शब्दांचे अतूट बंधन धर्मानेच राखले आहे.

मंगळसूत्र (वाट्या असलेले)
अ. मंगळसूत्र शक्यतो स्त्रीच्या अनाहतचक्रापर्यंत (छातीच्या मध्यापर्यंत) येईल, इतके लांब असावे.
आ. मंगळसूत्रातील वाट्या गोलाकार आणि पृष्ठभागावर कोणतीही कलाकुसर (नक्षी) नसलेल्या असाव्यात. नववधूसाठी शिंपल्याच्या आकारावर वेगवेगळ्या प्रकारची कलाकुसर किंवा वाट्यांवर उभ्या- आडव्या एकमेकांना छेद देणार्‍या रेषांची कलाकुसर असलेले मंगळसूत्र बनवू नये.

मंगळसूत्रबंधन
मंगळसूत्रातील ‘मंगळ (मंगल)’ हा शब्द शुभ काम्यवाचक (शुभकामना चिंतणारा), तर ‘सूत्र’ हा शब्द बंधनात्मक आहे.
मंगळसूत्राचा भावार्थ :
मंगळसूत्राला संस्कृतमध्ये `मांगल्यतंतू' असेही म्हणतात. यात दोन पदरी दोर्‍यात काळे मणी गुंफलेले असतात. मंगळसूत्राचे २ दोरे म्हणजे पतीपत्नीचे बंधन, ४ मणी म्हणजे धर्म, अर्थ, काम अन् मोक्ष हे चार पुरुषार्थ आणि २ वाट्या म्हणजे शिव-शक्ति यांचे प्रतीक होय. कर्माला शिव आणि शक्ति यांची जोड असली, तरच ते कर्म फलद्रूप होते.
वाट्यांना गुंफणारी तार धर्माने नववधूला सासरच्या कुलदेवीची उपासना करण्यास दिलेल्या अनुमतीचे दर्शक आहे.

मंगळसूत्राचे महत्त्व
अ. मंगळसूत्र हा सर्वांत जास्त प्रमाणात ईश्वरी तत्त्व आकृष्ट करणारा अलंकार आहे.
आ. मंगळसूत्रादी सौभाग्यालंकार म्हणजे स्त्रीला तिच्या पातिव्रत्याची जाणीव करून देणारे, तसेच तिचे वाईट शक्तींपासून रक्षण करणारे माध्यम आहे.

Admin
Admin

Posts : 62
Join date : 2011-03-22
Location : Pune

http://sampurnackp.co.cc

Back to top Go down

View previous topic View next topic Back to top


 
Permissions in this forum:
You cannot reply to topics in this forum