अंड्याचा कुर्मा

Go down

अंड्याचा कुर्मा

Post  Admin on Sun 03 Apr 2011, 7:21 pm

साहित्य :
६ अंडी, २ कांदे, १ वाटी ओला वाटाणा, अर्धी वाटी दही,
दिढ टीस्पून तिखट, १/४ टीस्पून हळद, १ टीस्पून हळद, एक टीस्पून मीठ, १/२
टीस्पून साखर, कोथिंबीर, २ टेबलस्पून तेल किंवा तूप

वाटण मसाला (१) :
अर्ध्या ओल्या नारळाचे खोबरे तेलावर गुलाबी रंगावर परतून घ्यावे व वाटावे.

वाटण मसाला (२) :
१ इंच आले, ६-७ लसूण पाकळ्या, १ टीस्पून धणे, १/४
टीस्पून सहाजीरे, १/२ टीस्पून मोहरी, ४ वेळच्या,६-७ काळी मिरी, ३-४ लवंगा, ३
तुकडे (१ इंची) दालचिनी [सर्व बारीक वाटावे.]

कृती:
अंडी उकडून उभे दोन भाग करावेत. कांदे उभे पातळ चिरावे. दही चमच्याने घोटून घ्यावे.
वाटाणा वाफवून घ्यावा.
कढईत तेल तापल्यावर कांदा घालून गुलाबी रंगावर परतावा. नंतर त्यावर वाटलेली मसाल्याची
गोळी घालून परतावे. नंतर त्यावर वाटलेले खोबरे, हळद, तिखट घालून ५ मिनिट परतावे.
नंतर दही घालून परतावे. तेल सुटू लागल्यावर त्यात २-३ वाट्या गरम पाणी घालावे.
मीठ व साखर घालावी व वाफवलेले वाटाणे घालावेत. ५ मिनिटे उकळून ध्यावे
मग त्यात अंडी, कोथिंबीर टाकून गॅस बंद करावा.

Admin
Admin

Posts : 62
Join date : 2011-03-22
Location : Pune

http://sampurnackp.co.cc

Back to top Go down

Back to top


 
Permissions in this forum:
You cannot reply to topics in this forum