गुढीपाडवा : चैत्र शुद्ध प्रतिपदा

View previous topic View next topic Go down

गुढीपाडवा : चैत्र शुद्ध प्रतिपदा

Post  Admin on Fri 01 Apr 2011, 1:25 pm

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हा हिंदु धर्मियांचा वर्षातील पहिला सण व नूतन वर्षाचा पहिला दिवस. अभ्यंगस्नान करणे, दाराला तोरणे लावणे व पूजा यांबरोबरच घरोघरी गुढी उभारून हा सण साजरा केला जातो. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती याच दिवशी केली. अशा या सणाला हिंदूंच्या जीवनात विशेष महत्त्व आहे. सूर्योदयाच्या वेळी प्रक्षेपित होणारे चैतन्य खूप वेळ टिकणारे असल्यामुळे सूर्योदयानंतर ५ ते १० मिनिटांत गुढीची पूजा करावी !
गुढीपाडव्याच्या दिवशी तेज व प्रजापति लहरी मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात. सूर्योदयाच्या वेळी या लहरींतून प्रक्षेपित होणारे चैतन्य खूप वेळ टिकणारे असते. ते जिवाच्या पेशींत साठवून ठेवले जाते व आवश्यकतेनुसार त्या जिवाकडून ते वापरले जाते. त्यामुळे सूर्योदयानंतर ५ ते १० मिनिटांत गुढीची पूजा करावी.

महत्त्व :
इसवी सन १ जानेवारीपासून, आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून, हिंदु वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून, व्यापारी वर्ष कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून, शैक्षणिक वर्ष जूनपासून, सौर वर्ष, चांद्र वर्ष व सौर-चांद्र वर्ष (लुनी सोलर) या वर्षांचेही निरनिराळे वर्षारंभ, इतके वर्षारंभ करण्याचे दिवस आहेत. यांत सर्वत्र बारा महिन्यांचेच वर्ष आहे. `वर्ष बारा महिन्यांचे असावे', असे प्रथम कोणी सांगितले व जगाने ते कसे मान्य केले ? याचा प्रथम उद्‌गाता `वेद' आहे. वेद हे अतीप्राचीन वाड्गमय आहे, याबद्दल दुमत नाही. `द्वादशमासै: संवत्सर: ।' असे वेदात आहे. वेदांनी सांगितले म्हणून ते जगाने मान्य केले. या सर्व वर्षारंभांतील अधिक योग्य प्रारंभदिवस `चैत्र शुद्ध प्रतिपदा' हा आहे. १ जानेवारीला वर्षारंभ का, याला काहीही कारण नाही. कोणीतरी ठरविले व ते सुरू झाले. याउलट चैत्र शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास नैसर्गिक, ऐतिहासिक व आध्यात्मिक कारणे आहेत.


नैसर्गिक :
ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंत- संपातावर येतो (संपात बिंदू म्हणजे क्रांतीवृत्त व विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांस छेदतात तो बिंदू होय.) व वसंत ऋतू सुरू होतो. सर्व ऋतूंत `कुसुमाकरी वसंत ऋतू ही माझी विभूती आहे', असे भगवंतांनी श्रीमद्‌भगवद्‍गीतेत (१०:३५) म्हटले आहे. या वेळी समशीतोष्ण अशी उत्साहवर्धक व आल्हाददायक हवा असते. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षवल्ली टवटवीत दिसतात.

ऐतिहासिक :
या दिवशी
अ. रामाने वालीचा वध केला.
आ. राक्षसांचा व रावणाचा वध करून भगवान रामचंद्र अयोध्येला परत आले.
इ. शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळवला.
ई. या दिवसापासूनच `शालिवाहन शक' सुरू झाले; कारण या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळवला.

आध्यात्मिकसृष्टीची निर्मिती :
ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो.

१ जानेवारी नव्हे, तर गुढीपाडवा हाच पृथ्वीचा खरा वर्षारंभदिन :
गुढीपाडव्याला सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्‍वाच्या उत्पत्तीकाळाशी निगडित असल्याने सृष्टी नवचेतनेने भारित होते. याउलट ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्‍वाच्या लयकाळाशी निगडित असते. गुढीपाडव्याला सुरू होणार्‍या नववर्षाची तुलना सूर्योदयाला उगवणार्‍या तेजोमयी दिवसाशी करता येईल.

गुढीपाडवा व गुढीपाडव्याच्या वेळी वापरण्यात येणार्‍या वस्तूंचे महत्त्व :
सूर्योदयाच्या वेळी प्रक्षेपित होणारे चैतन्य खूप वेळ टिकणारे असल्यामुळे सूर्योदयानंतर ५ ते १० मिनिटांत गुढीची पूजा करावी गुढीपाडव्याच्या दिवशी तेज व प्रजापती लहरी मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात. सूर्योदयाच्या वेळी या लहरींतून प्रक्षेपित होणारे चैतन्य खूप वेळ टिकणारे असते. ते जिवाच्या पेशींत साठवून ठेवले जाते व आवश्यकतेनुसार त्या जिवाकडून ते वापरले जाते. त्यामुळे सूर्योदयानंतर ५ ते १० मिनिटांत गुढीची पूजा करावी.

आंब्याच्या पानांचे महत्त्व :
इतर पानांपेक्षा आंब्याच्या पानांत जास्त सात्त्विकता असल्यामुळे त्यांची ईश्‍वरी तत्त्व खेचून घेण्याची क्षमता अधिक असते. गुढीच्या टोकाला आंब्याची पाने बांधली जातात. कोवळया पानांत तेजतत्त्व अधिक असते, म्हणून पूजेत आंब्याच्या कोवळया पानांचा वापर करावा.

कडूलिंबाच्या पानांचे महत्त्व :
गुढीला कडूलिंबाची माळ घातली जाते. ईश्‍वरी तत्त्व खेचून घेण्याची क्षमता आंब्याच्या पानांनंतर कडूलिंबाच्या पानांत जास्त असते. या दिवशी कडूलिंबाच्या कोवळया पानांद्वारे वातावरणात पसरलेल्या प्रजापति लहरी खेचून घेतल्या जातात. प्रजापति लहरी ग्रहण करण्यासाठी आवश्यक गुण सर्वसाधारण व्यक्‍तीत ईश्‍वराकडून येणार्‍या लहरी ग्रहण करण्याची क्षमता खूप कमी असते.


खालील गुण असणारा जीव या लहरी अधिकाधिक प्रमाणात ग्रहण करू शकतो :
१. अंतर्मनापासून सातत्याने ईश्‍वराचे स्मरण करणे
२. गुरु व ईश्‍वर यांच्यावर अढळ श्रद्धा असणे
३. ईश्‍वराची संकल्प शक्‍ती कार्यरत असणे
४. शक्‍तीचा वापर राष्ट्र व धर्म यांच्या कार्यांसाठी करणे

सूर्यास्तानंतर लगेचच गुढी उतरवावी ज्या भावाने गुढीची पूजा केली जाते, त्याच भावाने गुढी खाली उतरवली पाहिजे, तरच जिवाला तिच्यातील चैतन्य मिळते. गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवून व प्रार्थना करून गुढी खाली उतरवावी. गुढीला घातलेले सर्व साहित्य दैनंदिन वापरातील वस्तूंच्या शेजारी ठेवावे. गुढीला अर्पण केलेली फुले व आंब्याची पाने यांचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. गुढी सूर्यास्तानंतर लगेचच खाली उतरवावी. सूर्यास्तानंतर १ ते २ तासांत वातावरणात वाईट शक्‍ती कार्यरत होऊ लागतात. सूर्यास्तानंतरही गुढी उभी असल्यास त्यात वाईट शक्‍ती प्रवेश करू शकतात. त्या शक्‍तींचा आपल्याला त्रास होऊ शकतो.

गुढी उभारण्याची पद्धत
गुढीचे स्थान :
गुढी उभी करतांना ती दरवाजाच्या बाहेर; परंतु उंबरठ्यालगत (घरातून पाहिल्यास) उजव्या बाजूला उभी करावी.

पद्धत :
अ. गुढी उभी करतांना सर्वप्रथम सडासंमार्जन करून अंगण रांगोळीने सुशोभित करावे गुढी उभारण्याच्या जागी रांगोळीने स्वस्तिक काढून त्याच्या मध्यबिंदूवर हळद-कुंकू वाहावे.
आ. गुढी उभी करतांना ब्रह्मांडातील शिव-शक्‍तीच्या लहरींना आवाहन करून तिची स्वस्तिकावर स्थापना करावी. यामुळे गुढीच्या टोकावर अस लेल्या सर्व घटकांना देवत्व प्राप्‍त होते.
इ. गुढी जमिनीवर उंबरठ्यालगत; परंतु थोडीशी झुकलेल्या स्थितीत उभी करावी.


गुढीची पूजा करतांना व गुढी उतरवतांना पुढील प्रार्थना करावी :
अ. गुढीची पूजा करतांना करावयाची प्रार्थना : `हे ब्रह्मदेवा, हे विष्णु, या गुढीच्या माध्यमातून वातावरणातील प्रजापति, सूर्य व सात्त्विक लहरी आमच्याकडून ग्रहण केल्या जाऊ देत. त्यांतून मिळणार्‍या शक्‍तीतील चैतन्य सातत्याने टिकून राहू दे. मला मिळणार्‍या शक्‍तीचा वापर माझ्याकडून साधनेसाठी केला जाऊ दे.', हीच आपल्याचरणी प्रार्थना !

आ. गुढी खाली उतरवतांना करावयाची प्रार्थना : `हे ब्रह्मदेवा, हे विष्णु, आज दिवसभरात या गुढीत जी शक्‍ती सामावली असेल, ती मला मिळू दे , हीच आपल्याचरणी प्रार्थना !

धर्मध्वज पूजा-विधी
सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नम: ।

१. आचमन करणे : डाव्या हातात पळी घ्यावी. उजवा हात उताणा धरावा. पळीने उजव्या हातावर पाणी घ्यावे. पुढील नावे घेत कृती करावी.

श्री केशवाय नम:। (पाणी तोंडात घ्यावे.)

श्री नारायणाय नम:। (पाणी तोंडात घ्यावे.)

श्री माधवाय नम:। (पाणी तोंडात घ्यावे.)

श्री गोविंदाय नम: । (असे म्हणत उजव्या हातावरून ताम्हणात पाणी सोडावे.)

(हात पुसून घ्यावेत व जोडावेत.)

`श्री विष्णवे नम: ।' पासून `श्रीकृष्णाय नम: ।' पर्यंतची श्रीविष्णूची २० नावे म्हणावी.

`श्री विष्णवे नम: । श्री मधुसूदनाय नम: । श्री त्रिविक्रमाय नम: । श्री वामनाय नम: । श्रीधराय नम: । श्री हृषीकेशाय नम: । श्री पद्मनाभाय नम: । श्री दामोदराय नम: । श्री संकर्षणाय नम: । श्री वासुदेवाय नम: । श्री प्रद्युम्नाय नम: । श्री अनिरुद्धाय नम: । श्री पुरुषोत्तमाय नम: । श्री अधोक्षजाय नम: । श्री नारसिंहाय नम: । श्री अच्युताय नम: । श्री जनार्दनाय नम: । श्री उपेंद्राय नम: । श्री हरये नम: । श्रीकृष्णाय नम: ।

२. पुनराचम्य : पुनराचम्य म्हणजे वरील प्रकारे पुन्हा एकदा आचमन करणे.

३. हात जोडून म्हणणे :

इष्टदेवताभ्यो नम: ।

कुलदेवताभ्यो नम: ।

ग्रामदेवताभ्यो नम: ।

स्थान देवताभ्यो नम: ।

वास्तुदेवताभ्यो नम: ।

आदित्यादि नवग्रहदेवताभ्यो नम: ।

सर्वेभ्यो देवेभ्यो नम: ।

सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नम: ।

४. देशकाल :
डोळयांना पाणी लावावे. (भारतातील लोकांनी म्हणावयाचा देशकाल)

श्रीमद्‌भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया, प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे, विष्णुपदे, श्रीश्वेत-वाराहकल्पे, वैवस्वत मन्वंतरे, अष्टाविंशति तमे युगे, युगचतुष्के, कलीयुगे, प्रथम चरणे, जंबुद्वीपे, भरतवर्षे, भरतखंडे, रामक्षेत्रे, बौद्धावतारे, आर्यावर्तदेशे, शालिवाहन शके, अस्मिन्वर्तमाने व्यावहारिके, सर्वधारीनाम संवत्सरे, उत्तरायणे, वसंतऋतौ, चैत्रमासे, शुक्लपक्षे, प्रतिपद् तिथौ, रवि वासरे, रेवती दिवस नक्षत्रे, एेंद्र योगे, किंस्तुघ्न करणे, सर्वग्रहेषु यथायथं राशिस्थानानि स्थितेषु सत्सु एवंगुण विशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ, मम आत्मन: सकल शास्त्र श्रुति-स्मृति पुराणोक्‍त फल प्राप्‍त्यर्थम् ।

५. संकल्प करणे :
भांड्यातील अक्षता उजव्या हाताच्या बोटांनी घेऊन हाताचा तळवा वरच्या दिशेला करावा. मग अंगठा सोडून उरलेल्या चार बोटांवरून अक्षता हळूहळू तळव्यावरती घसरत आणाव्यात. स्वत:चे गोत्र व नाव उच्चारावे, उदा. `काश्यप गोत्र व बाळकृष्ण नाव' असल्यास `काश्यप गोत्रे उत्पन्न: बाळकृष्ण शर्मा अहं', असे म्हणावे व पुढील संकल्प करावा.

`अस्माकं सर्वेषां, सह कुटुंबानां, सह परिवाराणां, क्षेम, स्थैर्य, अभय, विजय, आयु:आरोग्य प्राप्‍त्यर्थं अस्मिन् प्राप्‍त नूतन वत्सरे, अस्मद् गृहे, अब्दांत: नित्य मंगल अवाप्‍तये ध्वजारोपण पूर्वकं पूजनं तथा आरोग्य अवाप्‍तये निंबपत्र भक्षणं च करिष्ये । निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपति पूजनं / स्मरणं करिष्ये । कलश, घंटा, दीप पूजां करिष्ये ।'

(`करिष्ये' म्हणतांना उजव्या हातातील अक्षतांवर पाणी घालून ताम्हणात सोडाव्या व हात पुसावेत. ज्यांना गणपतिपूजन करता येत असेल त्यांनी `पूजनं करिष्ये', असे म्हणावे व सुपारीवर किंवा नारळावर गणपतीची पूजा करावी ज्यांना येत नाही, त्यांनी `स्मरणं करिष्ये', असे म्हणावे व खालीलप्रमाणे गणपतीचे स्मरण करावे.)

६. श्री गणपतिस्मरण

वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ । निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।। महागणपतिं चिंतयामि नम: ।

७. कलश, घंटा, दीप पूजन करणे :

गंध-फूल अक्षता वाहून कलश, घंटा, दीप यांची पूजा करावी.

१. कलशाय नम: । सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि ।

२ घंटिकायै नम: । सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि ।

३. दीपदेवताभ्यो नम: । सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि ।

८. ब्रह्मध्वज पूजा

ॐ ब्रह्मध्वजाय नम: । ध्यायामि । (हात जोडावे.)

ॐ ब्रह्मध्वजाय नम: । विलेपनार्थे चंदनं समर्पयामि । (गंध लावणे)

ॐ ब्रह्मध्वजाय नम: । मंगलार्थे हरिद्रां समर्पयामि । (हळद वहाणे)

ॐ ब्रह्मध्वजाय नम: । मंगलार्थे कुंकुमं समर्पयामि । (कुंकू वहाणे)

ॐ ब्रह्मध्वजाय नम: । अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि । (अक्षता वहाणे)

ॐ ब्रह्मध्वजाय नम: । पूजार्थे पुष्पं, तुलसीपत्रं, दुर्वांकुरान्, पुष्पमालांच समर्पयामि । (फूल, तुळशीचे पान व दूर्वा वहाव्यात व फुलांचा हार घालावा.)

ॐ ब्रह्मध्वजाय नम:, धूपं समर्पयामि । (उदबत्ती ओवाळणे)

ॐ ब्रह्मध्वजाय नम:, दीपं समर्पयामि । (निरांजन ओवाळणे)

९. नैवेद्य :
उजव्या हातात तुळशीची दोन पाने घेऊन त्यावर पाणी घालावे. नैवेद्याच्या ताटाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने एकदाच पाणी फिरवावे. नैवेद्यावर तुळशीच्या दोन पानांनी पाणी प्रोक्षण करून एक पान नैवेद्यावर ठेवावे व दुसरे ब्रह्मध्वजाच्या चरणी वहावे. `ॐ ब्रह्मध्वजाय नम: । नैवेद्यार्थे पुरस्थापित (नैवेद्याचे नाव घ्यावे.) नैवेद्यं निवेदयामि ।' त्यानंतर `ॐ प्राणाय स्वाहा, ॐ अपानाय स्वाहा, ॐ व्यानाय स्वाहा, ॐ उदानाय स्वाहा, ॐ समानाय स्वाहा, ॐ ब्रह्मणे स्वाहा, हे मंत्र म्हणत उजव्या हाताच्या पाचही बोटांच्या टोकाने तळवा देवाकडे येईल, अशा तर्‍हेने नैवेद्याचा वास देवाकडे न्यावा किंवा हात जोडून `ॐ प्राणाय स्वाहा, ॐ अपानाय स्वाहा, ॐ व्यानाय स्वाहा, ॐ उदानाय स्वाहा, ॐ समानाय स्वाहा, ॐ ब्रह्मणे स्वाहा', या मंत्राने देवाला नैवेद्य समर्पित करावा. नंतर उजव्या हातावर पाणी घेऊन `समर्पयामि' म्हणतांना, ते पाणी ताम्हणात सोडावे. `ब्रह्मध्वजाय नम:। नैवेद्यं समर्पयामि । मध्ये पानीयं समर्पयामि, उत्तरापोशनं समर्पयामि, हस्त प्रक्षालनं समर्पयामि, मुख प्रक्षालनं समर्पयामि ।' उजव्या हातात गंध फूल घेऊन ते ब्रह्मध्वजाच्या चरणी वहावे. `करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि ।' `ॐ ब्रह्मध्वजाय नम: । मुखवासार्थे पूगीफल तांबूलं समर्पयामि ।' (विड्यावर पाणी सोडावे.) `ॐ ब्रह्मध्वजाय नम: । फलार्थे नारिकेल फलं समर्पयामि ।'(नारळावर पाणी सोडणे)

१०. आरती ओवाळणे

(गणपतीची आरती म्हणावी.) `ॐ ब्रह्मध्वजाय नम: । मंगलार्तिक्य दीपं समर्पयामि ।'

११. कापूर ओवाळणे

`ॐ ब्रह्मध्वजाय नम: । कर्पूर दीपं समर्पयामि ।'

१२. `ॐ ब्रह्मध्वजाय नम: । प्रदक्षिणां समर्पयामि ।' (स्वत:भोवती प्रदक्षिणा घालावी. शक्य असल्यास गुढीला घालावी.)

१३. `ॐ ब्रह्मध्वजाय नम:। नमस्कारान् समर्पयामि ।'(नमस्कार करावा.)

१४. प्रार्थना :
`ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रद । प्राप्‍तेस्मिन् वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरु ।।' अर्थ : सर्व इष्ट फल देणार्‍या अशा हे ब्रह्मध्वज देवते, तुला मी नमस्कार करतो. या नवीन वर्षामध्ये माझ्या घरात नेहमी मंगल, म्हणजे चांगले घडू दे. `अनेन कृत पूजनेन ब्रह्मध्वज: प्रीयताम् ।' (उजव्या हातावर अक्षता घेऊन त्यावर पाणी घालून त्या ताम्हणात सोडाव्यात. `विष्णवे नमो ।, विष्णवे नमो । विष्णवे नम: ।', असे म्हणावे व सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे दोन वेळा आचमन करावे.)

१५. निंब पत्र (कडुनिंबाचे पान) भक्षण करावे.

(टीप : शब्दांचा अर्थ कळावा व संस्कृत शब्दांचे उच्चार करणे सोपे जावे; म्हणून ते शब्द तोडून लिहिले आहेत.)

कडुनिंबाचा प्रसाद बनवण्याची कृती :
कडुनिंबाची फुले, कोवळी पाने, चण्याची भिजलेली डाळ किंवा भिजलेले चणे, मध, जिरे आणि थोडासा हिंग एकत्र मिसळून प्रसाद तयार करावा व तो सर्वांना वाटावा.

संधर्भ :
सनातन संस्थानिर्मित ग्रंथ ' सण,धार्मिक उत्सव व व्रते '
http://balsanskar.com
Admin
Admin

Posts : 62
Join date : 2011-03-22
Location : Pune

http://sampurnackp.co.cc

Back to top Go down

View previous topic View next topic Back to top


 
Permissions in this forum:
You cannot reply to topics in this forum