चिंबोरी मसाला

Go down

चिंबोरी मसाला

Post  Admin on Wed 30 Mar 2011, 7:13 pm

सामग्री :
६ मध्यम आकाराच्या चिंबोऱ्या,
३ कांदे, २ दालचिनीचे तुकडे,
१ टीस्पून हळद,
२ लवंगा,
२ टीस्पून तिखट,
३ काळीमिरी,
३ हिरव्या मिरच्या,
१ टीस्पून बडीशोप,
१/२ आल,
१ टीस्पून खसखस,
८-९ लसणाच्या पाकळ्या (भाजून घ्यावे),
३ टीस्पून तेल, १ टीस्पून धणे,
मीठ साखर चवीप्रमाने.


कृती :-
चिंबोरीच्या मोठ्या नांग्या व बारीक तंगड़्या काधूनघ्या. चिंबोरी अलगत फ़ोडावी.
आतील पेंदा किंवा पोटाचा भाग काढून घ्याव व कवच टाकून घ्यावे.
पेंद्याच्या आतील छोटी पिसे व लाख काढून टाकावी, तो स्वच्छ ढूवावा.
नांग्या व तंगड्याही धूवून घ्याव्यात. तंगड्याचा ठेचून रस काढावा व गाळून घ्यावा.

आले, लसून, कोथिंबीर, एकत्र, वाटून चिंबोरीला लावा. हळद, तिखट व मिठ लावावा.
१ कांदा चिरून तेलावर तळून घ्यावा.लाल झाल्यावर सुके खोबरे घालून भाजून घ्यावे.
खोबरे लाल झाल्या नंतर धेणे, लवंग, दालचिनी, काळीमिरी, बडीशोप, खसखस,
घालून परतून घ्यावे. खमंग वास आला की सर्व एकत्र वाटावे.

तेलावर २-३ लसणाच्या पाकळ्या फ़ोडणीस टाकाव्या, त्या लाल झाल्यावर त्यावर चिरलेला
कांदा टाकावा. कांदा मऊ झाला की मसाला लावलेली चिंबोरी टाकावी व परतावी. थोडे पाणी
घालून शिजवावे. शिजवल्यावर चिंबोरीचा रंग लालसर होतो. त्यावर चिंचेचा कोळ व वाटलेला
कांदा खोबऱ्याचे मिश्रण घालावे. थोडे पाणी घालून चांगले उकळवावे.

अश्याच प्रकारे Laubster मसालाही करता येतो.





Admin
Admin

Posts : 62
Join date : 2011-03-22
Location : Pune

http://sampurnackp.co.cc

Back to top Go down

Back to top


 
Permissions in this forum:
You cannot reply to topics in this forum